बाल समाज मंडळ

 बाल समाज मंडळ 


बाल समाज मंडळ हे शुक्रवार पेठेतील एक जुने मंडळ आहे. येथे एक पेशवेकालीन हनुमानचे मंदिर आहे त्याचे नाव जाळीचा मारूती मंदिर आहे. मंडळाची स्थापना १८९४ साली झाली. येथील स्थानिक लोकांनी या मंडळाची स्थापना केली आहे. 

सांगण्यात येते की या मंडळाची मूर्ती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी साकारली आहे. हिंदुस्थानीतली तिसरी मूर्ती आहे जी भाऊसाहेब रंगारी यांनी तयार केली आहे. या मूर्तीचा इतिहास म्हणजे ही मूर्ती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी मारूती मंदिरातील ब्राम्हण गुरूजी यांना भेट म्हणून दिली होती. तीच मूर्ती त्या गुरूजींनी या मंदिरात ठेवली आणि त्यानंतर ती मंदिरातून मंडळाकडे सुपूर्त करण्यात आली. गणेशोत्सव मूर्तीचे पूजन करून ती मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवली जाते व गणपती विसर्जन मिरवणुकीत ही मूर्ती सभागी केली जात नाही तर मंडळाने दुसरी मूर्ती तयार करून घेतली आहे अ्से मंडळाचे कार्यकर्ते यांनी माहिती दिली आहे.

दुसरी मुर्ती


Address बाल समाज मंडळ 

Comments