गरूड गणपती मंडळ

 लोकांनी दिले नाव - गरूड गणपती. 

लक्ष्मी रस्ता संपण्या आधीचा चौकता नारायण पेठेत आहे हे मंडळ. या चौकाला सध्या गरूड गणपती मंडळ असे म्हणतात. 

१९४४ साली मंडळ स्थापन झाले. हे मंडळ दौंडकर कुटुंब यांनी या मंडळाची स्थापना त्यांच्या घरात बसवून केली. १९४७ साली गणपती जाधव यांच्या वाड्याच्या कड्यावर बसवून उत्सव साजरा करत. त्याचे कारण घरातील जागा कमी पडू लागली. ह्या काळा पर्यंत मंडळ "गणेश मंडळ" या नावाने ओळखले जात. १९५० साली मंडळ उत्सव साजरा लक्ष्मी रस्त्यावर करण्यास सुरुवात केली व बालसेवक गणेश मंडळ असे नाव देण्यात आले. 

मंडळातील एक कार्यकर्ता गंगाराम माथफोड हे नवयुग स्टुडिओ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. त्यांनी एके वर्षी स्टुडिओ मधील तयार करण्यात आलेला गरूड त्यांनी मंडळात सजावटीसाठी आणला. १२ फुट उंच व २५ फुट रूंद असा हा गरूड होता. त्या वर्षी गणपती गरूडावर बसवले व त्या गरुडाचे पंख हलायचे, असे देखावा सादरीकरणात आले. गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी शिडी वरून जावे लागत. नंतर हाच सगळा सेट विसर्जन सोहळ्यात सहभागी करण्यात आला. गरुडाचे पंख रस्त्याच्या रूंदीत मावत नाही, म्हणून ते दुमडून घेतले. विसर्जन सोहळ्यात गरूडावर बसलेला गणपती बघण्यास गर्दी झाली व गरूडावरचा गणपती असे लोक बोलु लागले आणि लोकांनी नाव पाडले "गरूड गणपती".

पहिली मंडळाची मूर्ती

नागेश शिल्पी मूर्ती बनवताना

त्यानंतर १९७६ साली मंडळाने नविन मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तीकार "नागेश शिल्पी" यांच्या कडून बनवून घेतली व ती उत्सवात सहभागी केली. नागेश शिल्पी यांनी पहिल्यांदा संकल्पित मूर्तीचे चित्र रेखाटून दाखवले. त्यानंतर त्यांनी १ फूटाच्या उंचीची मूर्ती बनवून दाखवली. ती पसंत पडल्यावर त्यांनी मोठी मूर्ती घडवण्यास सुरवात केली. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुर्ती ग्रहणात घडवली आहे व तीचे डोळे काचेचे आहेत व मुगुटावर कीर्तिमुख आहे. मंडळाची मूर्ती ग्रहणात घडवली आहे व मूर्तीच्या पोटात विधिपूर्वक गणेश व महालक्ष्मी यंत्र बसवले आहे. मूर्तीचे काम हे हडपसर पुणे येथे झाले.



गरूड - गजानन मंडळाची एकत्र मिरवणूक 

मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी "गजानन मंडळ" यांच्या सोबत अनंत चतुर्दशीची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. ५-६ वर्ष झाले हा उपक्रम चालू आहे. अशी माहिती आहे या गणपती मंडळाची.

बोला गणपती बाप्पा मोरया।।

पहिल्या दिवशीची मिरवणूक

 Address - गरूड गणपती मंडळ

Comments