श्री रास्ता पेठ सार्वजनीक नायडू गणपती मंडळ
पुण्यातील रास्ता पेठेतील हे मंडळ त्यांच्या मूर्ती साठी प्रसिद्ध आहे. मंडळाची स्थापना १९२६ साली झाली. मंडळाचे आधीचे नाव "रास्ता पेठ सार्वजनिक मंडळ" असे होते. नंतर ते नाव बदलून "रास्ता पेठ सार्वजनिक नायडू गणपती मंडळ" असे ठेवण्यात आले. मंडळातील कार्यकर्त्यांचा कल शारदा-गजानन ची मूर्ती बसवण्याचा होता. दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते शारदा-गजानन च्या वेगवेगळ्या मूर्त्या बसवत.
२००० साली मंडळातील कार्यकर्ते व रास्ता पेठेतील गणेश भक्तांनी कायमस्वरूपी शारदा-गजाननची मोठी मूर्ती बसवावी अशी इच्छा व्यक्त केली आणि मातीची नवीन शारदा-गजानन ची मूर्ती बनवली. ही मुर्ती मुंबई चे मूर्तीकार खानविलकर यांनी बनवली. एका बाजूला सिंह व दुसऱ्या बाजूला मोर आणि मध्ये शारदा-गजानन अशी सुबक मूर्ती बनवली.सिंहावर गणपती विराजमान आहे तर मोरावर शारदा विना धारण करून विराजमान आहे.मूर्ती पाहून कार्यकर्ते व भावीक खुपच खुश झाले. पुण्यात वेगवेगळ्या शारदा-गजानन च्या मूर्ती पैकी ही एक आहे. काही वर्षात या मंडळाने ह्या मूर्ती सारखीच दुसरी फायबरची मूर्ती बनवून घेतली. मातीची जी मूर्ती आहे ती मूर्तीकार खानविलकर यांच्या कारखान्यात आहे. अशी माहिती आहे या गणपती बाप्पाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।
Morya ❤❤💯💯
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏
Delete❤ श्री शारदा गजानन प्रसन्न ❤
ReplyDeleteजय शारदा-गजानन
Deleteजय गणेश ❤️
ReplyDeleteजय गणेश 🌺🙏
DeleteBappa Morya🙏
ReplyDeleteबाप्पा मोरया🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteपुण्याच्या पूर्व भागातील सर्वात जुने मंडळ आहे. आणि विशेष म्हणजे 1926 पासून पुढील काही वर्षे शारदा गजाननाच्या विविध मुद्रा असलेली सुबक आणि रेखीव मूर्ती मूर्तिकार खानविलकर यांनी बनविलेली आहे.
ReplyDelete🙏जय गणेश 🙏