बनकर बंधू गणपती

बनकर बंधू गणपती -

हा कोणत्याही मंडळाचा गणपती नाही तर हा कै. पै. रामचंद्र बनकर यांच्या घरातला गणपती आहे. त्यामुळे या गणपतीची ओळख बनकर बंधू गणपती अशी केली जाते. कै. पै. रामचंद्र बनकर (उर्फ गामा पैलवान ) यांनी हा गणपती आपल्या घरी बसवला. १९९१ साली या गणपतीची स्थापना करण्यात आली. भवानी पेठेत त्यांच्या रहात्या घरी बसवायला सुरूवात केली.

लहान मूर्ती - शाडू मातीची

मोठी मूर्ती - फायबरची

पुण्यात ४ मूर्त्या राक्षसाचा वध करतानाच्या आहेत. पण कै. पै. रामचंद्र बनकर (उर्फ गामा पैलवान ) यांनी पुणे शहरात ज्या राक्षसाचा वध करणारे गणपती आहे त्या सर्वांची पाहणी केली व या सर्व मुर्तींपेक्षा काहीतरी वेगळे मूर्ती घडवावी असा मानस करून त्यांनी मूर्तीकार राऊत आर्टीस्ट ( रास्ता पेठ ) यांच्याकडून तशी घडवून घेतली. एक लहान २ फुटाची मूर्ती बनवली व त्या वरून मोठी मूर्ती बनवली गेली. मोठी ४ फुटांची मूर्ती आहे. तसे एकुण तीन मूर्त्या एकसारख्या आहेत. त्यातील एक मूर्ती शाडू मातीची तर एक फायबरची मूर्ती आहे. एक लहान मूर्ती शाडू मातीची आहे. गणपती राक्षसाचा वध करताना अशी मूर्ती आहे. त्यामुळे या गणपतीस महिषासुरमद गणपती असेही म्हणतात.
हा गणपती कुठल्याही मंडळाचा नाही पण दर गणेशोत्सवात लोकांना दर्शनासाठी खुला असतो. या गणपतीची मिरवणूक काढली नाही जात बनकर कुटुंबीय गणपतीची मनोभावे सेवा करतात. त्यांनी या गणपतीच्या मूर्तीचे वर्षो न वर्षे जतन केले आहे. अशी माहिती आहे या गणपतीची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।

बनकर कुटुंबीयांच्या घरातील गणेशोत्सव


Comments