वंदे मातरम संघ

 वंदे मातरम संघ




सदाशिवपेठेचे आराध्यदैवत म्हणुन हे मंडळ ओळखले जाते.

मंडळाची स्थापना १९५१ साली झाली. कै.रमेश शिवराम दीक्षित यांनी बाकी मंडळींना एकत्र घेउन मंडळाची स्थापना वाड्यात केली वाड्याचेनाव तावरे वाडा असे होते.

मंडळाची गणेश मूर्ती ही अतिशय आकर्षक आहे. पाटावर बसलेली ही गणेशमूर्ती सुबक आणि रेखीव आहे. कै.प्रकाश गोसावी यांनी या मंडळाची गणेशमूर्ती बनवली आहे.स्थापना केल्यानंतर ही गणेशमूर्ती तिसरी आहे. दुसरी मूर्ती पण या गणेशमूर्ती सारखीच होती.

कै.सुरेश शिंदे हे मंडळातील एक थोर गणेश भक्त होते. गणपती वर खुप भक्ती व बप्पाची सेवा, सकाळी रोज  चुकता गणेश मंदिर उघडायचे व गणेश मंदिराची निगा ठेवायचे हे काम नचुकता करत होते. नव्या पिढीला मंडळाचे कार्य करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी कायम प्रयत्नशील होते. आकर्षक विद्युत रोषणाई ,कारंज हे देखावे सादर करणे ही या मंडळाची वैशिष्ट्य आहे. आकर्षक फुलांचे रथ मिरवणूकीचे आकर्षण असते. अशी ही माहिती आहे या मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया!!


मंडळाची पहिली गणेशमूर्ती 

मंडळाची दुसरी गणेशमूर्ती 

मिरवणुकीत सादर केलेले फुलांचे रथ


कारंजाचा देखावा

विद्युत रोषणाईचे देखावा




Address - VANDE MATRAM SANGH

Comments