पुण्याला लाभले- एक थोर मूर्तीकार!!


कै.श्री.नागेश शिल्पी (१९३५-२०१०)

 तसे खूप मूर्तीकार आहेत, त्यातील एक म्हणजे जगप्रसिद्ध मूर्तिकार कैलासवासी श्री. नागलिंग शंकराप्पा आचार्य शिल्पी पंडित उर्फ कैलासवासी श्री.नागेश शिल्पी (१९३५-२०१०). पुण्यातील गणपती आणि मूर्तीकार कैलासवासी श्री.नागेश शिल्पी यांचे एक नाते आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी घडवलेल्या पैकी ८ मूर्त्या या पुण्यात विराजमान आहेत.

यांनी साकारलेली सर्वांगसुंदर अद्वितीय गणेश मंडळांच्या मूर्ती मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (तिसरी मूर्ती) , जिलब्या मारुती गणपती,  निंबाळकर तालीम मंडळ, गजानन मंडळ,  गरुड गणपती मंडळ,  माती गणपती, जगोबादादा तालीम  मंडळ, मार्केटयार्ड शारदा गणेश मंडळाची. ह्या ८ मूर्त्या पुण्यात विविध ठिकाणी विराजीत आहेत.


मूर्ती घडवतानाचे फोटो.

तसेच त्वस्टा कासार समाज पुणे, श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगाव दाभाडे, अमर मित्र मंडळ सासवड, जय गणेश मंडळ कराड, गजानन मित्र मंडळ महाड, अशा मिळून पुण्यात  १३ गणपतीच्या मुर्त्या कै.श्री.नागेश शिल्पी यांनी घडवल्या. त्या सर्व मूर्ती शास्त्रोक्त विधिवत होम हवन मुहूर्त पाहूनच घडवलेल्या असल्यामुळे त्यांनी घडवलेल्या गणपतीच्या मूर्ती नवसाला पावतात. या मूर्त्या मध्ये श्री गणपती यंत्र, श्री लक्ष्मी यंत्र व श्री विश्वकर्मा यंत्र सिध्द करूण गणपतीच्या पोटात बसवण्या आले आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक मूर्ती या एकच चाकोरीबद्ध एक सारख्या नव्हत्या. सगळ्या मुर्त्या मध्ये एक वेगळेपण आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येम मूर्तीचे डोळे हे आकर्षण  असायचं प्रत्येक मूर्तीकडे पाहताना ती मूर्ती आपल्याकडेच आशीर्वाद रुपी पाहत असल्याचं जाणवते. त्यांनी फक्त मातीच्या नाही तर ब्रॅाझ, सोने, चांदी व लाकडाच्या मूर्त्या साकारल्या आहेत. त्यांच्या मूर्त्या भारतात नाही तर लंडन, अमेरीका येथे पण मूर्त्या पोचल्या आहेत.

तांच्या कारकीरदी मध्ये त्यांच्या या कलेसाठी त्यांना खुप पुरस्कार व मोठ्या लोकांना कडून त्यांचा सम्मान देखिल झाला आहे. राष्ट्रपती व्हि व्हि गिरी, ग्यानी झैलसिंग, शंकरदयाळ शर्मा हस्ते सत्कार करण्यात आला होता.

असा थोर मूर्तीकार पुण्याला लाभला याचे आम्हाला आभिमान आहे. अशा या थोर व जगप्रसिध्द मूर्तीकाराला त्रिवार वंदन.


॥बोला गणपती बप्पा मोरया॥

        पुण्यात  १३ गणपतीच्या मुर्त्या कै.श्री.नागेश शिल्पी यांनी घडवल्या

Comments