राजर्षी शाहू चौक मित्र मंडळ
पुण्यात शुक्रवार पेठेत आहे हे मंडळ. शाहू चौकात हे प्रसिद्ध मंडळ आहे. मंडळाची स्थापना १९२२ साली झाली आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी या मंडळाची स्थापना केली आहे.
एका गणेश भक्ताने गणपती पुढे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला व पुर्ण झाल्यावर मोठी गणपतीची मूर्ती देण्यास कबूल केले.जेव्हा त्या भाविकाली पुत्रप्राप्ती झाली तेव्हा त्याने मुंबई चे मूर्तीकार अरविंद शेडगे यांच्या कडून १९७२ साली बनवून घेतली व मंडळास दिली. मूर्ती कडे बघून बाल गणेश हास्य देतो असे भासते. गणपतीची मूर्ती बैठी असुन ती दिसायला सुरेख आणि सुबक आहे. मंडळाकडे हुबेहूब दिसणारे दोन मूर्त्या आहेत. एक पॅस्टर आॅफ पॅरिस तर दुसरी फायबरची आहे. मंडळ सुरवातीला हालते देखावे गणेशोत्सवात सादरीकरण करण्यात आले होते. पण आता वेगवेगळ्या मंदिर उभारण्यात आले आहे. अशी या मंडळाची माहिती आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।