नागनाथपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

नागनाथपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ -


हे मंडळ सर्वात जुन्या मंडळांपैकी एक आहे. शंभराहून अधिक वर्ष जुने मंडळ आहे. मंडळाचे नाव नागनाथपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असे असले तरीही त्याची ओळख रिध्दी-सिध्दी गणपती अशी जास्त आहे.हे मंडळ पुण्यातील सदाशिव पेठेतील मध्य भागात आहे. १८९३ साली या मंडळाची स्थापना नरहरीशेठ वासूळकर यांनी स्थानिक लोकांना एकत्र घेऊन केली. 

मंडळ सुरवातीला वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती मूर्ती बसवत असे. १९८३ साली मंडळाच्या सदस्यांनी ठरविले की मंडळाची कायमस्वरूपी गणेश मूर्ती बसवायची व ती पुराणात सांगितल्या प्रमाणे असली पाहिजे. सर्व कार्यकर्ते यांनी वेदाचार्य घैसास गुरूजींची भेट घेतली व त्यांना सर्व माहिती व इच्छा त्यांच्या समोर मांडली. गुरूजी यांनी कार्यकर्त्यांना पेणचे मूर्तीकार मधुकर भोइर यांच्याकडून बनवून घेण्यास सांगितले. त्यांनी त्या बरोबर हे पण सांगितले की मूर्तीचे काम सुर्योदय दे सूर्यास्त या वेळातच करायचे आहे. कार्यकर्त्यांनी मूर्तीकार मधुकर भोइर यांना सर्व माहिती दिली व त्यांच्या कडून ती बनवून घेतली. तब्बल एक वर्ष या मूर्तीचे काम चालू होते. १९८४ या बनवलेल्या मूर्तीची स्थापना घैसास गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विविध यंत्र मूर्ती मध्ये बसवण्यात आले आहे.

मूर्तीकार मधुकर भोइर यांनी बनवलेली मूर्ती

मूर्ती बदल बोलायचे झाले तर अशी मूर्ती दुसरीकडे कुठेही बघायला मिळत नाही. अशी मूर्ती फक्त पुण्यातच आहे. मूर्ती शाडू मातीची बनली आहे. एकाच सिंहासनावर आसनस्थ गणपती व गणपतीच्या बाजूला रिध्दी-सिध्दी आसनस्थ आहेत. मूर्ती सुबक व खूप सुंदर आहे. तिघांचे चेहरे रेखीव व त्या वरच तेज खूप आहे. रिध्दी-सिध्दी व गणपती अशीही मूर्ती प्रमाणबद्ध आहे. कालांतराने या मूर्तीची चकाकी व दरवर्षी रंग काम करून ती जीर्ण होउ लागली. मग २००० साली तशीच मूर्ती हुबेहूब पुण्यातील प्रसिद्ध मूर्तीकार पार्सेकर यांच्या कडून बनवून घेतली आहे. ही पण मूर्ती शाडू मातीची आहे. 

मूर्तीकार पार्सेकर यांनी बनवलेली मूर्ती

या मूर्ती मुळे मंडळाला रिध्दी-सिध्दी गणपती असेही म्हटले जाते. रिध्दी-सिध्दी गणपती असलेले हे पुण्यातील प्रसिद्ध मंडळांपैकी एक आहे. पुण्यात बरेच गणपतीच्या मूर्त्या आहे पण पायात खडावा असलेली ही एकच मूर्ती आहे. अशी या मंडळाची वैशिष्ट्य व माहिती आहे. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 



Comments