श्री लाकडी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
शुक्रवार पेठेतील हे एक प्रसिद्ध मंडळ आहे. मंडळाची स्थापना : १८९६ साली झाली आहे. जुन्या मंडळाची पैकी एक मंडळ आहे.
लाकडी गणपती सार्वजनिक मंडळाचे वैशिष्टय़ हे त्याच्या नावातच दिसून येते. पिंपळाच्या बुंध्यातून तयार केलेल्या गणपतीच्या मूर्तीची लोकमान्यांनी १८९६ साली स्थापना करून मंडळाची सुरुवात झाली. मारुती सखाराम खेडकी यांनी घडवलेली रिद्धी-सिद्धीसहित असणारी ही अप्रतिम मूर्ती मंडळाचे अनोखे आकर्षण ठरली. गणपतीची मूर्ती खुप अनोखी आहे. गणपती मध्ये विराजमान आहे तर एका बाजूला सिध्दी तर दुसऱ्या बाजूला सिद्ध उभे राहिले आहे.
जुनी लाकडी गणपतीची मूर्ती
शतकोत्तर वाटचालीत मात्र एका दु:खद घटनेला मंडळास सामोरे जावे लागले. २००० साली मंडळाच्या इमारतीस आग लागल्यामुळे १०७ वर्ष जुनी मूर्ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. एका अनमोल ठेव्यास मंडळाला मुकावे लागले. पुढील उत्सवासाठी शाडूची मूर्ती तयार केली. पण प्राणप्रतिष्ठापना करताना तिलादेखील तडा गेला. मग पुन्हा लाकडाचीच मूर्ती तयार करण्याचे ठरले आणि भगवान सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दीड वर्षे खपून मूळ मूर्तीसारखीच पण उंचीने सव्वा फूट मूर्ती घडवली. अभिजीत व अरविंद घोंडफळे यांनी या मूर्तीचे रंगकाम केले.
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।