उल्हास मित्र मंडळ

उल्हास मित्र मंडळ

अशाच या कलाकृती मध्ये 'उल्हास मित्र मंडळ 'गुरुवार पेठ, या पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंडळ. 'श्री'ची मूर्ती हि नेहमी आकर्षणाची विषय ठरलेली आहे. १९३५ साली या मंडळाची स्थापना झाली, १९४४ साली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रुपये 'चार-चार' आणे वर्गणी काढून या मूर्ती ची निर्मिती केली अस सांगितलं जातं. या मूर्तीचे मूर्तिकार श्री शंकरराव भोसले (प्रभात फ़िल्म कंपनी) १९४५ साली या मूर्तीची निर्मिती केली. विशेष  बाब म्हणजे फ्रेंच चित्रकार Léon Bonnat याच्या Samson's youth या १८९१ साली केलेल्या पैंटिंग चा आधार घेऊन  #१९४५ साली श्री शंकर रावभोसले यांनी अथक प्रयत्नाने संपूर्ण लाकडी काम करून या मूर्तीची निर्मिती केलेली आहे. या कलाकृती मध्ये सिंह, हरणाचे बछडा, नाग आणि 'श्री गणेश अश्या 'सिंह' वधाचा प्रसंग कलाकाराने अतिशय कल्पकतेणे, सुबकरित्या, साकारला आहे. मूर्ती ची उंची ४ आणि रुंदी ५ फूट आहे . हिंदुस्तानातील सर्वात पहिली 'श्री' ची सिहारुढ संपूर्ण_लाकडी_मूर्ती' अशी या मूर्ती ची ओळख आहे. गणेशोत्सवाच्या या काळात पूर्ण १० दिवस 'श्री' च्या मूर्तीला विविध पोशाख परिधान केले जातात. या पोशाखा मध्ये मूर्तीच रूप अधिकच खुलत हे वेगळंच. 



Comments