रामेश्वर चौक तरुण मंडळ

रामेश्वर चौक तरुण मंडळ

हे मंडळ पुण्याच्या मध्य भागात आहे. श्रीनाथ टॉकीज वरून पुढे मंडईला जो रोड जातो त्या चौकात हे मंडळ आहे. जुन्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आहे. १९५६ साली या मंडळाची स्थापना केली. 

मंडळाची मूर्ती सुबक आहे. पाटावर बसलेली ही गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीकार दत्ता टेकडे ( मांगल्य कार्यालय , बुधवार पेठ , दत्त मंदिर समोर ) यांनी ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे फिरती लायटींग व दहीहंडीचा उत्सव. अशी माहिती आहे या मंडळाची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments