जयदीप मंडळ
हे मंडळ कर्वे रोडवर स. एन. डी. टी. बस स्टॅपजवळ आहे. तसे मंडळ खूप प्रसिद्ध आहे. श्री. हरिकिसन राठी , कै.एकनाथ कुर्हाडे , श्री. दशरथ धोत्रे , श्री. भगवान मोहीते , श्री. नारायण राठी , श्री. मारुती पवार , कै. सखाराम रणशुर. आणि अन्य सहकारी यांनी या मंडळाची स्थापना केली आहे. १९७० साली या मंडळाची स्थापना केली.
मंडळाची गणपतीची मूर्ती ही खूप रेखीव व सुंदर आहे. पहिली मूर्ती आताच्या मूर्ती सारखीच होती. पण ती काही कारणास्तव बदलन्यात आली. पाटावर मांडी घालून बसलेली ही गणपतीची मूर्ती आहे. सगळी कामे मुर्ती श्री. कानडे . हे गृहस्थ पाहतात. मंडळाची ओळख म्हणजे लायटींगचा गणपती अशी आहे. मंडळ दरवर्षी सुरेख फिरती लायटींग करतात हे वैशिष्ट्य आहे. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।