तरवडे गणपती

 तरवडे गणपती - 

भाऊसाहेब रंगारी गणपती नंतर ज्या गणपतीची स्थापना झाली तो म्हणजे तरवडे गणपती. हा गणपती कुठल्याही मंडळाचा नाही. हा तरवडे यांच्या घरातील गणपती. त्या वेळी पुण्यातील पहिल्या ५ सार्वजनिक गणपतीपैकी हा एक गणपती.


भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी गणेशोत्सवाच्या आयोजन बाबत बैठक झाली. १८९३ साली तरवडे यांच्या घरी या गणपतीची स्थापना झाली. बंडोबा मल्हारराव तरवडे यांच्या सोमवार पेठ खडी मैदान जवळील राहत्या घराचा हा गणेश. या गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली आहे. 

ही गणपती मूर्ती स्वतः भाऊसाहेब रंगारी यांनी बनवली आहे. ही मूर्ती इको र्फेंडली आहे म्हणजे कागदी लगद्यापासून बनवली आहे. ही मूर्ती इतर मूर्त्यांपेकक्षा वेगळी आहे.  ३ वेगळ्या मूर्त्यांनी ही एक मूर्ती बनली आहे. ३ दानवांना मारताना दर्शविणारी ही मूर्ती आहे. दानवांच्या रूपात ब्रिटिश व गणपतीला भारतमाता असे ही मूर्ती दर्शवते. दानवांचा वध करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार अशी कल्पना आहे या मूर्ती स्वरूपात. मूर्ती खूप भव्य व देखनी आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हीचे विर्सजन होत नाही. कायम स्वरूपी ही मूर्ती तरवडे यांच्या घरात ती कायमची संभाळी जाते. अशी माहिती आहे या गणपतीची. 

बोला गणपती बाप्पा मोरया।। 


Comments