दगडी नागोबा तरूण मंडळ ट्रस्ट -
गणेश पेठ व रविवार पेठ या भागातील नागझरीकाठी असणारे हे वैशिष्ट्यपूर्ण एक प्रमुख देवस्थान आहे. दगडी नागोबा मंदीर हे पुण्याच्या प्राचीनत्वाची ग्वाही देणारे ठिकाण म्हणजे दगडी नागोबा देवस्थान.या मंदीरा मुळे या मंडळाचे नाव दगडी नागोबा तरूण मंडळ ठेवले.हे मंडळ पुण्याच्या मध़्य भागातील एक प्रमुख मंडळ आहे. मंडळाची स्थापना रविवार परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली. मंडळ हे १९३४ साली स्थापन झाले गणपतीची मूर्ति ही विलोभनिय आहे. सुंदर व देखणी ही गणपतीची मूर्ति बसलेली आहे एक पाय मांडी घालून तर दुसरा पाय खाली सोडून आहे. मुंबईचे शेंडगे मूर्तिकार यांनी ही गणपतीची मूर्ती बनवलेली आहे.श्रावणात नागपंचमीचा उत्सव येथे जल्लोषात साजरा होतो.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।