आझाद मित्र मंडळ -
मंडळ हे पुण्यातील मध्य भागात म्हणजे भवानी पेठेत आहे. मंडळाची स्थापना १९८२ साली झाली. दशरथ भिलारे, माणिक गुजराथी, सुहास महाजन, रविंद्र कोंढरे, विजय कोंढरे यांनी मंडळाची स्थापना केली आहे.
जूनी मूर्ती
मंडळाची मूर्ती सुबक व रेखीव आहे. गणपती पाटावर मांडी घालून बसलेली आहे. ती जूनी मूर्ती काही कारणांमुळे बदलून नविन मूर्ती बनवली. सागर भावसार हे या नव्या मूर्तीचे मूर्तीकार आहेत. पहिल्या मूर्ती सारखी जवळपास नविन मूर्ती आहे.
मंडळाचे भव्य मंदिर आहे. त्या मंदिराला 'श्रीवरदविनायक मंदिर' असे नाव दिले आहे.मंदिरात श्रीगणरायांचा नित्य नियमाने विधिवत यथासांग पूजा, अभिषेक व आरती केली जाते. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक गौरी प्रतिष्ठापना करणारे पहीले सार्वजनिक मंडळ आहे. यामध्ये सजावटीतून प्रत्येक वर्षी सामाजिक संदेश दिला जातो. वर्षभर मंदिरातील मंडळाच्या माध्यमातून पार पडणाऱ्या प्रत्येक सणाला महिलांकडून प्रचंड सहभाग असतो व महिला स्वतः पेपर मटेरियल मध्ये निरनिराळी कल्पक सजावट करतात. याउपरोक्त मंदिरात स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प सुद्धा आहे त्याची नित्यनियमाने अभिषेक केला जातो. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।