जय महाराष्ट्र तरूण मंडळ -
हे मंडळ पुण्याच्या मध्यभागी भवानी पेठेत आहे. या मंडळाची भवानी पेठचा महाराजा असेही ओळखले जाते.
मंडळाची स्थापना १९४७ साली झाली आहे. नथुराम आण्णा कोंढारे यांनी स्थानिक लोकांनाच्या मदतीने मंडळाची स्थापना केली. पवार मूर्तीकार आहेत त्यांनी गणपतीची मूर्ती बनवली आहे. गणपती मांडी घालून पाटावर बसलेल्या अवस्थेत आहे. मूर्ती खूप रेखीव आहे. मूर्तीला बघीतले की महाराजाचा भास होतो. म्हणून की काय या गणपतीला भवानी पेठचा महाराजा असे म्हणतात. मंडळाकडे गणपतीच्या दोन मूर्त्या आहेत. दोन्ही मूर्त्या एक सारख्या आहेत. एक मूर्ती मातीची तर दुसरी फायबरची आहे. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।