जोत्याची तालीम मंडळ

जोत्याची तालीम मंडळ - गणेश पेठचा राजा

जोत्याची तालीम या नावाला एक इतिहास आहे आधीचा काळात म्हशीचा गोठ्यांला जोत्त असे म्हणत आणि या जागेत पण म्हशींचा व्यवसाय चालत असे. सर्व दुग्धव्यवसाय निगडित लोकांनी पुढाकार घेऊन आधी तालीम स्थापन केली  व नंतर गणपती उत्सव साजरा करू लागले म्हणून मंडळाचे नाव जोत्याचि तालीम मंडळ असे पडले. हे मंडळ पुण्याच्या मध्यभागात म्हणजे गणेश पेठेत आहे. मंडळ खूप प्रसिद्ध आहे.

तालमीबद्दल माहिती -

तालमीचे पंच - मा.सुनील शेठ बोडके , मा. बबनराव निकम , मा. चंद्रकांत (दादा) मोरे , मा.यशवंत (दादा) सुर्वे , मा. गोरे ही मंडळी. 

मंडळाचे नामांकित मल्ल :- मा. पै. कै. वसंतराव परदेशी, मा. पै. कै. पांडुरंगराव निर्मळे, मा. पै. कै. रंगनाथराव बोडके, मा. पै. कै. गोपाळराव बोडके, मा. पै. कै. प्रभाकरराव निंबाळकर, मा. पै. श्री. धर्मराज ( भाऊ ) माने.

मंडळाची स्थापना १९४४ साली झाली आहे. तालमीतील व स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंडळाची स्थापना केली. गणपतीची मूर्ती अगदी तालमीतील लढवैय्या सारखीच आहे. पहिलवान गणपतीचा उदिष्ट -
उभा गणपतीची मूर्ती ही हनुमंताचा प्रतीक आहे. पहीलवांना त्यासारखी  देहयष्टी यासाठी व देवाचे दर्शन घेतांना युवापिढी व्यायामाकडे प्रोत्साहित होवू व तालीम मध्ये येऊन त्यांनी सराव करावा. येणारी पिढी बलशाली व्हावी हा या पहिलवान गणपती मूर्ती मागचा उद्देश आहे. 

पहिली मूर्ती

१९७७ साली मंडळाच्या सदस्यांनी दुसरी मूर्ती मूर्तीकार प्रकाश गोसावी यांच्या कडून बनवून घेतली. मूर्ती चौरंगावर बसलेली आहे. एक पाय मांडी घालून आहे तर दुसरा सरळ खाली सोडून आहे. अश्या प्रकारच्या तीन मूर्त्या त्यांनी बनवल्या आहेत. मंडळ दोन्ही मूर्त्या गणेशोत्सवात असतात. गणेश पेठचा राजा असे ही ह्या मंडळाची ओळख आहे. अशी माहिती आहे या मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।

दुसरी मूर्ती

शेवटच्या दिवशीची मिरवणूक




Comments