बाजीराव रोड नातूबाग मंडळ -
पुण्याचा आधिपती या नावाने या गणपतीला नावाजले जाते. बाजीराव रोड वरील नावाजलेले मंडळ आहे.
मंडळाची स्थापना १९४३ साली झाली. मंडळाची मूर्ती दिसायला ही भारदस्त वाटते. मूर्ती खूप रेखीव आहे. प्रकाश गोसावी यांनी ही मुर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती काळा नुसार थोडी जीर्ण झाली. म्हणून तशीच दिसणारी दुसरी मूर्ती त्याच मूर्तीकारा कडुन बनवून घेतली. मंडळचे वैशिष्ट्ये म्हणजे हा विद्युत रोषणाईचा राजा मानला जातो. याचे कारण हे दरवर्षी गणपतीत लायटिंगची वेगवेगळी नेत्रदीपक आरास करतात. खास गाण्याच्या तालावरची चालणारी लायटिंग बघायला लोक लांबून येतात. पुण्यात लायटिंगचा गणपती असे संबोधले जाते. अशी माहिती आहे या गणपती मंडळाची.
बोला गणपती बाप्पा मोरया।।
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।