अरण्येश्वर अखिल तावरे काॅलनी मित्र मंडळ

अरण्येश्वर अखिल तावरे काॅलनी मित्र मंडळ - (अखिल अरण्येश्वर गणपती, ट्रस्ट)

ह्या मंडळाची स्थापना सन १९७६ दि २८ ऑगस्ट या दिवशी अरण्येश्वर- तावरे काॅलनी, पुणे या ठिकाणी करण्यात आली. भगवान शंकराच्या अरण्येश्वर भागातील हे पहिले मंडळ स्थापन झाले. मंडळाचे संस्थापक श्री जगन्नाथ रघुनाथ तावरे तसेच श्री आबासाहेब वाघमारे, श्री चंद्रकांत पासलकर, श्री रमेश जोशी, श्री जगन्नाथ साळुंके, कै गजानन देशपांडे, कै मनोहर ढमाले, कै सुर्यकांत कोल्हटकर व कै सुर्यकांत शिंदे या सर्वांनी मिळून तावरे काॅलनी येथे मंदीरात गणेश मुर्तीची स्थापना केेेली. 

ह्या मंडळाची गणेश मूर्ती साडे तीन फुट उंचीची असुन एक पाय मोडुन तर एक पाय खाली सोडलेल्या स्वरुपात कमळाच्या गोल घुमटावर बसलेली आहे. मुर्ती च्या मुकुटाच्या मध्यावर कायमस्वरूपी रत्न बसविले आहे. ह्या मंडळाची गणेश मूर्ती स्थापन वर्षा पासून कायम आहे. तिला बदलण्यात आले नाही. ह्या मूर्तीचे मूर्तीकार परदेशी काका हे आहेत. त्यांनी पुण्यामध्ये अशा स्वरुपाच्या अजुन ३ मूर्त्या बनवल्या आहेत:-
१. गुरुदत्त मित्र मंडळ, रविवार पेठ
२. पुरंदर मित्र मंडळ, बालाजी नगर
३. सहकारनगर मित्र मंडळ, अरण्येश्वर.
ह्या मंडळाचा गणेशोत्सव अरण्येश्वर नगर चौकात होत असे. पण उत्सवाचे स्वरूप वाढत गेले आणि उत्सव अरण्येश्वर नगर मैदानावर होउ लागला. अशी ह्या गणपती व मंडळाची माहिती दिली आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया।।

पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक

काही जुन्या उत्सवाचे छायाचित्र

Comments