पर्वती दर्शन नागरिक संघ

पर्वती दर्शन नागरिक संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

पुण्यातील प्रसिद्ध पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या गणपती मंडळ. लक्ष्मीनारायण थेटरच्या मागील बाजूस आहे.

ह्या मंडळाची स्थापना १९६२ साली झाली. मंडळाचे संस्थापक सुरेश जाधव आहेत. मंडळाची पहिली मूर्ती उभी होती. मूर्ती उभी असल्याने ती बदलून नवीन केली.जूनी मूर्ती मंडळाने शिवाजी मित्र मंडळ,शिवदर्शन  यांना दिली आहे. नवीन मूर्ती खूप रेखीव आहे. पाटावर मांडी घालून बसलेली गणपतीची मूर्ती आहे. प्रकाश गोसावी हे या गणपतीचे मूर्तीकार आहेत. त्यांनी एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती बनवल्या आहेत त्या पुढील प्रमाणे  : 

१)पर्वती दर्शन नागरिक संघ

२)जुन्या जाईचा गणपती

३)आझाद हिंद मित्र मंडळ (सकाळ प्रेस जवळ) 

 हे मंडळ पर्वती दर्शन मधील गणेशोत्सवाचे उगमस्थान आहे. अशी माहिती आहे या गणपती बाप्पाची. 

बोला गणपती बप्पा मोरया।। 

पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक

Address - पर्वती दर्शन नागरिक संघ



Comments

Post a Comment

धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।