आझाद मित्र मंडळ

फेट्याचा लाडका गणपती

मंडळ हे लक्ष्मी रस्ता व कुमठेकर रस्ता या दोन रस्ता जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावर आहे. आझाद चौक असे नाव चौकाला आहे म्हणून मंडळाचे नाव आझाद मित्र मंडळ असे दिले. 


विशेष म्हणजे मूर्ती. ही मूर्ती शनिवारवाडा जवळ गणपती स्टोल वरून घेण्यात आली. पण मूर्ती खूप रेखीव व सुबक आहे. पदमाकर शितोळे, राहुल थोरात, उल्हास घुणे, प्रेम घुणे व तुकाराम देडगे या मंडळींनी मंडळाची स्थापना केली. मंडळ १स्पटेंबर १९७० साली स्थापन झाले. मंडळ गेली १५ वर्षा पासून दरवर्षी गणेशोत्सवात गणपतीला वेगवेगळे फेटे घालतात, म्हणून गणपतीला फेट्याचा लाडका गणपती असे म्हणतात. 

नविन मूर्ती ५० वर्षासाठी बनवली 


मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक नवीन मूर्ती खास मूर्तीकार विनोद येलारपूरकर यांच्या कडून घेतली. ती मूर्ती नंतर त्यांनी दांडेकर पूला जवळील एका मंडळास दिली. अशी आहे ह्या मंडळाची माहिती. 


पहिल्या दिवशीची मिरवणूक


गणपती बाप्पा मोरया।। 

Address - आझाद मित्र मंडळ

Comments