*गणपतीची मुळ आरती*
आपले आराध्य दैवत श्रीगणेशाची " सुखकर्ता दु:खहर्ता " ही आरती जी सर्वश्रुत आहे,जी सर्वांना पाठ आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी ही आरती लिहीली. आणि श्री क्षेत्र शिवथरघळ येथे श्रीगणेशाची स्थापना करुन ही आरती समर्थ म्हणाले. विचार केला की आजच्या योग्य वेळी इतरांनाही सांगावे म्हणून येथे पोस्ट केली आहे. मी सुद्धा ही आरती पहिल्यांदाच वाचत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी....
समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित ही आरती आपणाकडून ३ कडवीच म्हंटली जातात पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे...
ती खालिलप्रमाणे आहे....
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||१||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मनकामना पुरती ||ध्रु||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ||
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ||जय.||२||
माथा मुकुट मणी कानी कुंडले |
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ||
नागबंद सोंड-दोंद मिराविले |
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ||जय||३||
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे |
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ||
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत |
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ||जय||४||
छत्रे चामरे तुजला मिरविती |
उंदीराचे वाहन तुजला गणपती ||
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी |
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ||जय||५||
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती |
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ||
ताल मृदंग वीणा घोर उमटती |
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ||जय||६||
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ||जय||७||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
गणपती बाप्पा मोरया....
मंगलमूर्ती मोरया....
जय जय रघुवीर समर्थ....
जय गणेश
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।