Vinchurkar Wada Ganpati

लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती


जसे आपण मागील पोस्ट मध्ये वाचले, त्या प्रमाणे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. त्यासाठी त्यांनी जो गणपती बसवला तो सरदार विंचूरकर वाड्यात. आज आपण या गणपती बाप्पाची माहिती जाणून घेऊ. 

सरदार विंचूरकर हे मूळचे सासवड येथील दाणी, काम होते धान्याचे हिशेब ठेवायचे. बाजीराव पेशवे यांच्या बरोबर विठ्ठल दाणी सर्व लढाई करत. विठ्ठल दाणी हे विंचूरकर घराण्याचे संस्थापक. त्यांनी सदाशिव पेठेत दुमजली वाडा बांधला. हाच तो वाडा जिथून लोकमान्य टिळकांनी जन जागृती आणि बाकी कार्य हीथे राहून सुरूवात केली. 


विंचूरकर वाडा 

 

१८९४ साली टिळकांनी ह्या वाड्यात गणपतीची स्थापना केली. येथून सार्वजनिक गणेशोत्सवची सुरूवात झाली. टिळक त्यांच्या गणपती पुढे व्याख्याने करत. ह्या गणपतीचे दर्शन घेत व त्यानंतर लोक टिळक व इतर लोकांनचे व्याख्याने होत ती ऐकत. व्याख्यानात हिंदू धर्म व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी होत. ह्याच वाड्यात टिळकांनी केसरी या वृत्तपत्राची सुरूवात केली. 

असा महत्त्वाचा इतीहास ह्या वाड्याचा जिथून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. आता सद्यस्थितीत हा वाडा नाही तिथे मोठी इमारत आहे. पण लोकमान्य टिळकांच्या आठवणी व बाकी महत्त्वाच्या गोष्टी ते चित्रांच्या माध्यमातून जतन केले आहे. 

।।बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Address - Vinchurkar Wada Ganpati

Comments