Lokhande Talim Ganpati

।।लोखंडे तालीम संघ।। 



१८९६ साली अप्पा बळवंत चौकातल लोखंडे तालमी मंडळ गणपतीची स्थापना झाली. अप्पा बळवंत चौकाची ओळखला म्हणून ह्या गणपतीची मंडळाची खुन दिली जाते. केरबा कारळ, गणपतराव चक्के, म्हळबा वावरे, दगडोबा राक्षे, नाना उंदरे, नारायण बापू आढाव, बुवासाहेब शिंदे या लोकांनी मंडळ स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या वर्षी केवळ साठ रुपये वर्गणी गोळा झाली होती. त्यातून अडीच रुपयांची गणपतीची मूर्ती आणून ह्या मंडळानी गणेशोत्सव सुरू केला. 

स्वातंत्र्याच्या आधी समाज जागरण, स्वातंत्र्य चळवळीला पूरक असे उपक्रम सादर करण्यावर सारा भर होता. मंडळाचे कार्यकर्ते द्राक्षे यांचा मेळा त्या काळी अतिशय गाजला होता. मात्र केवळ मेळे, व्याख्याने न करता मंडळांचे कार्यकर्ते नानासाहेब सोनवणे, शिंगटे बंधू, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. त्या वेळी इंग्रजांनी मेळ्यावर बंदी घातली. त्यामुळे चलेजाव आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंडळाच्या त्या वर्षीच्या मिरवणुकीत इंग्रजी 'Q' आकाराचा फेर विसर्जनाच्या मिरवणुकीत धरण्यात आला होता. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करायचा कल ठेवला. अनेक नामवंत कलाकारांनी या मंडळाला भेट दिली. १९६५ साली मंडळाने मुंबईचे शिल्पकार राम सारंग यांच्याकडून नवीन गणेशमूर्ती तयार करून घेतली. तीच आताची उत्सवमूर्ती आहे. ही मुर्ती कागदी लगद्यापासून बनवली आहे. ही मुर्ती बघताच तालमीच्या लढवैय्याची ओळख दर्शावते. बाकी मंडळांपेकषा ही मुर्ती वेगळीच आहे. ही मुर्ती खडबडीत आहे पण दिसायला खुप आकर्षक आहे. मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते.

दुसरी मुुर्ती

पहील्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक


।। बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments