Kasba Ganpati in Thailand

कसबा गणपती आता थायलंडला


आपल्या पुण्यातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातील काही गणपतीची मुर्ति त्यांनी तिकडे स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात अजुन एक भर पडली आहे. परदेशात लोकप्रिय आहे पुण्यातील गणेशोत्सव व तो बघायला परदेशातील अनेक लोक येतात.

आपल्या पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती म्हणजे मानाचा पहिला गणपती ह्याची हुबेहूब दोन मुर्त्या थायलंड मध्ये बनवल्या आहेत. थायलंड चे एक गणपती भक्त दरवर्षी पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवात पुण्यात येतात.
Varuut Rachata असे नाव आहे.


त्यांची कसबा गणपती वरील भक्ती व श्रद्धा खुप आहे. त्यामुळे त्यांनी हुबेहूब दोन मुर्त्या बनवल्या आहेत. त्यातील एक मुर्ति चाइंगमई येथील गणेश म्युझियम मध्ये तर दुसऱ्या मुर्तीची प्रतिष्ठापना बॅंकॅकमधील लक्ष्मीनारायण मंदिरात केली आहे.


ह्या वर्षी करोना मुळे पुण्यात येऊन कसबा गणपतीचे दर्शन घेता येणार नाही ह्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे बॅंकॅकमधील लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन घ्यावे लागणार आहे. ह्या वर्षीचा गणेशोत्सव ते थायलंड मध्ये साजरा करणार आहेत.

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Comments