गणनायकाच्या दर्शनाची सैनिकांना लागली ओढ ...



जय गणेश !
६ मराठा परिवारासाठी बाप्पांची मूर्ती काश्मीरकडे रवाना
भारतीय लष्करातील ६ मराठा परिवाराच्या वतीने जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा सैनिकांनी व्यक्त केली. सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मूर्ती बनविली आणि शनिवार, दिनांक सहा जून रोजी सकाळी मूर्ती काश्मीरकडे रवाना करण्यात आली.
६ मराठा परिवारातील सैनिकांनी मंदिर बांधले. या मंदिरात गणनायकाच्या मूर्तीची स्थापना करण्याची त्यांची इच्छा होती. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी अशीही त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांना विनंती करणारे पत्र पाठविले. त्यात त्यांनी म्हटले, आमचे युनिट (६ मराठा दल) सध्या गुरेज सेक्टर (जम्मू काश्मीर) मध्ये कार्यरत आहे. आम्ही येथे एक गणेश मंदिर बनवले आहे. मंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची कायमस्वरूपी स्थापना करु इच्छितो. या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पा चा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुळे आमच्या मंदिराची शोभा वाढेल. याकरीता आपण अडीच फुटांची गणेश मूर्ती मंदिरासाठी भेट म्हणून द्यावी.
कर्नल पाटील यांचे पत्र मिळताच ट्रस्टच्या विश्वस्तांनी या विनंतीचा सन्मान राखून मूर्ती भेट म्हणून पाठविण्याचे ठरविले. सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल खटावकर यांनी अल्पावधीत मूर्ती बनवली. मा.विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल विवेक खटावकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपती ची हुबेहूब 36 इंच मूर्ती तयार केली ही मूर्ती फायबरची असून ती बॉर्डर वर गुरेज सेक्टर (जम्मू - काश्मीर) येथे मुर्ती स्थापन होणार आहे.
आठ दिवसात हि मूर्ति त्यांनी तयार केलीदगडूशेठ गणपती मंदिरात सकाळी धार्मिक विधी करुन मूर्ती सैनिकांकडे सोपविण्यात आली. त्यांनी ती रेल्वेमार्गे काश्मीरकडे रवाना केली.
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।