।।त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळ।।
हे मंडळ खुप महत्वाचे आणि प्रतिष्ठीत आहे. ह्या मंडळाची व गणपती बाप्पाची काय माहिती आहे ती जाणून घेऊ.
पहील्या गणेशोत्सव साजरा झाला आणि त्याचे पडसाद सर्व लोकांनवर झाला. त्याचा परिणाम असा झाला की सर्व समाजातील लोक पुढे सरसावली पुढील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी. त्यातील एक म्हणजे त्वष्टा कासार समाज. ह्या समाजातील लोकांनी पुढे एकत्र येऊन गणेशोत्सव मंडळ सुरू केले. १८९३ साली स्थापन करण्यात आली ह्या मंडळाची. मंडळाचे सदस्य राजाराम रघुनाथ लोंढारे यांच्या पुढाकाराने या मंडळाची सुरुवात झाली. ह्या मंडळामुळे कासार समाजातील लोक पुढे आली आणि त्यांची ओळख समाजाला झाली. १८९३ साली स्थापन करण्यात आली गणेश मुर्ती ही एक आगळीवेगळी आहे. आगळीवेगळी याचे कारण आतापर्यंत आपण ज्या मुर्त्या बघितल्या त्या शाडू मातीच्या किंवा कागदी लगद्यापासून बनवलेल्या आहेत. पण ही लाकडी मुर्ती आहे. ही मुर्ती अखंड शमीच्या लाकडी खोडाची आहे. आपल्याला सांगु इच्छितो की शमीचे झाड हे गणपतीला प्रिय आहे. कहीचे कोरीव काम इतके सुंदर आहे की लाकडाची मुर्ती आहे हे कळतच नाही. ह्या मुर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मुर्तीचे तीन भाग होतात. तसेच ह्या मुर्तीचा प्रत्येक भाग वेगळा होउ शकतो. ह्या मुर्तीच्या मस्तकावर एक छोटे छिद्र आहे त्याला भ्रमरंग असे म्हणतात. त्यामुळे हावेतील सुध हवा, योगीग दृष्ट्या हवेतील उर्जा प्राप्त केली जाते आणि जो भावीक ह्या गणपतीची मूर्ती पुढे नतमस्तक होतो त्याला ही मिळते. हे मंडळ दरवर्षी चांगले व म्हत्वाचे कार्यक्रम आयोजित करतात. ह्या मंडळाची सगळी व्यवस्था गणेशोत्सव दरम्यानची व मिरवणूकीची महीला बघतात. असे ह्या गणपती मंडळाची माहिती आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया......
Address - Twashta Kasar Mandir
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।