Nimbalkar Talim Ganpati

।।निंबाळकर तालीम गणपती।। 




हे मंडळ आहे पुण्यातील सदाशिव पेठेतील. हे मंडळ तालमीतील लोकांनी एकत्र येऊन तालमीत गणपती बसवायला चालू केले. १९२० साली स्थापना करण्यात आली. तालमील पैलवान मंडळी ग्यानबा अभंग, गणपतराव कोंढाळकर, बापुसाहेब गोराडे, सोनबा शितोळे, अनंतराव काशीद, बापुसाहेब शिंदे आदींनी पुढाकार घेऊन मंडळाची स्थापना केली. पहील्या वर्षी गणेशोत्सवात हा तालीमतल्या खिडकीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मंडळाची ही तिसरी मूर्ती असून पहिल्या दोन मुर्त्या दत्ताच्या अवतारातील होत्या.

तालीमतल्या खिडकीत गणपतीची प्रतिष्ठापना

प्रथम मुर्ती

दुसरी मूर्ती

तिसरी मुर्ती

मंडळाची ही तिसरी मूर्ती मूर्तीकार श्री.नागलिंगाचार्य शिल्पी पंडित" यांजकडून खग्रास सूर्यग्रहणात तयार करण्यात आली आहे. श्री.नागलिंगाचार्य शिल्पी पंडित यांनी पुण्यात सासवड तळेगाव दाभाडे कराड असे फक्त १३ गणपती केले त्यातील ही एक. श्री.नागलिंगाचार्य शिल्पी पंडित मूर्ती करताना ती शास्त्रोक्त पद्धतीनेच केली अगदी मूर्ती बनवताना शुचिर्भुत राहून माती कालवून मग होमहवन विधी करुन केली. 
मंडळाची मुर्ती ही एक वेगळी आणि अनोखी आहे. जटाधारी, ध्यानस्थ मुद्रेतील ही मुर्ती आहे.मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गणपतीच्या पोटात "गणेश यंत्र", "लक्ष्मीयंत्र", "नवग्रह यंत्र", "सरस्वती यंत्र" सिद्ध करुन बसवली आहेत. ह्या मंडळाचे वैषीठ्य म्हणजे ह्या मंडळानी एकदा शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजन केले. त्यानंतर  ती परंपरा सुरू झाली. ह्या कार्यक्रमात मोठ्या द्यीगज कलावंतानी संगीतकार येउन गेले. असे ह्या मंडळाची माहिती. 

पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक


।।गणपती बाप्पा मोरया।। 
।। जय गणेश।। 


Comments