जिलब्या मारूती मंडळ।।
एक खास वैशिष्ट्य आहे या नावात. चला आपण जाणून घेऊ आज ह्या गणपती विषयी.
जिलब्या मारूती मंडळ हे एक नावाजलेले मंडळ. शहराच्या मध्यभागी असलेल्या हे मंडळ. व्यापारी ठिकाणी या मंडळाचे मंदिर आहे. त्याच बाजुला एक छोटे मारुती मंदिर आहे. या मारुतीला तिथल्या एका मिठाईवाल्याने दररोज पहिल्या जिलब्यांचा प्रसाद म्हणून हार घालायचा. नंतर १९५४ साली या मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर त्या मिठाईवाल्याने दररोज पहिल्या जिलब्यांचा प्रसाद म्हणून हार घालायला सुरुवात झाली. त्यामुळे या गणपती चे नाव जिलब्या मारूती मंडळ असे ठेवण्यात आले.
मंडळाची मुर्ती ही खुप सुंदर आणि रेखीव आहे. ही मुर्ती मुर्तीकार श्री नागेश शिंपी यांनी घडवली आहे. यात गणेश यंत्र बसवले आहे. हे मंडळ सुरवातीचे १० वर्ष देखावे प्रदर्शित करत होते. परंतु मंडळाच्या हितचिंतक व कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर मंडळ त्या नंतर गणपतीच्या मूर्तीला विचारात घेऊन त्यांनी त्यानंतर वेगवेगळे महल उभारण्यास सुरुवात केली. मंडळाचे आजुन एक वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षी गणपतीत १० पैकी १ दिवशी ते जिलब्यांचा प्रसाद म्हणून ठेवतात. मिरवणूकीत सुद्धा मंडळ जिलब्या वाटतात.
असे ह्या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. हे मंडळ गणेशोत्सवा बरोबर दहीहंडी, नवरात्री उत्सव सुध्दा साजरे करतात.
Comments
Post a Comment
धन्यवाद 🙏,
मंगलमूर्ती मोरया।।