Babu Genu Ganpati

Navsacha Ganpati (Babu Genu Ganpati)

हुतात्मा बाबू गेनू गणपती।।

नवसाचा गणपती असेही ह्या गणपतीची ओळख आहे. खुप रोमांचक अशी कहाणी आहे या गणपतीची. 

हे मंडळ १९७० साली स्थापन झाले. अवघे २ वर्षे झाली होती, मंडळाची मुर्ती खेडेकर यांनी घडवली. पण ही मुर्ती खुप वजनाने जड झाली, म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुसरी मुर्ती कायमस्वरूपी तयार करण्यासाठी निर्णय घेतला. ही गोष्ट १९७३ सालची आहे.

मग आनंदराव वाईकर यांना ही मुर्ती बनविण्यास सांगितले. तेव्हा मंडळाकडे फक्त ७०० रूपयांची वर्गणी  हातात होती. मुर्ती २१०० रुपयांची होती. तरीही बनवण्यासाठी सांगितले. मूर्तिकार अनंतराव वाईकरांकडून ही मूर्ती साकारण्यास सुरुवात झाली़. पण धडापर्यंत मूर्ती तयार झाली आणि वाईकर यांचे अकाली निधन झाले़. मंडळाच्या मुर्तीचे पुढे कसे काय करावे याचा प्रश्न उपस्थित झाला कार्यकर्त्यांनपुढे. 

मग काय सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच मुर्ती पुढे पुर्ण होण्यासाठी नवस केला. त्याचेच फळ स्वरुपी मुर्तीकार प्रकाश गोसावी यांनी पुढे ती मुर्ती पुर्ण केली. काही दिवसांत ही मुर्ती कार्यकर्त्यांना हावी तशी पुर्ण झाली. त्यामुळे या गणपतीला नवसाचा गणपती असे म्हणतात.

ह्या गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे यंत्र गणपतीच्या मुगुटाच्या मागील बाजूस आसुन ते दर्शनीय आहे. मुर्ती दिसायला सुबक आहे. मंडळ दरवर्षी भव्य शिल्प लोकांचे लक्ष वेदुन घेण्यासाठी उभारते. 

मंडळाच्या गणपतीची पहिल्या दिवशीची मिरवणूक फुलांच्या रथात तर शेवटच्या दिवशी भव्य रथात असते. हे मंडळ गणेशोत्सव तर साजरा करतातच त्या सोबतच दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला हे सुद्धा ह्या मंडळाचे खास  वैशिष्ट्य आहे. पुण्यातील सार्वजनिक दहीहंडी पैकी  ह्या मंडळाच्या दहीहंडी ला  मानाचे स्थान आहे अशी आहे ह्या गणपतीची माहिती.

पहिल्या दिवशीची मिरवणूक

शेवटच्या दिवशीची मिरवणूक

बोला गणपती बाप्पा मोरया।। 

Address - Babu Genu Ganpati

Comments